File photo
भंडारा

भंडारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, दोन जखमी

Bhandara Accident News | धारगाव येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : कोकणागड यात्रेतून स्वगावाकडे जात असलेल्या दुचाकीस्वाराला भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात एक जण जागीच ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना धारगाव येथे दि. 26 फेब्रुवारी रोजी रात्री 7.30 वाजताच्या दरम्यान घडली. रघुनाथ मारोती सिडाम (45, रा. टेकेपार माडगी) असे मृतकाचे नाव आहे. तर कृष्णा भगवान चवळे (29) व रवी सिडाम असे जखमीचे नाव आहे.

धारगाव जवळील टेकेपार माडगी येथील मृतक रघुनाथ सिडाम यांची सासूरवाडी कोकणागड असून महाशिवरात्रीला त्याच्यासोबत कृष्णा भगवान चवळे (२९) व रवी सिडाम हे होते. यात्रा आटोपून मोटारसायकलने स्वगावाकडे जात असताना धारगाव येथे महामार्गावर भंडाराकडून लाखनीकडे भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात रघुनाथ सिडाम याचा जागीच मृत्यू झाला. तर कृष्णा चवळे व रवी सिडाम हे किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर चालक हा घटनास्थळावरून पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होऊन जखमी कृष्णा चवळे याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. महामार्ग पोलीस गडेगावचे पोउपनि सावरकर, बबन अतकरी, अतूल रायपूरकर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रूग्णालयात पाठविण्यास सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT