Lightning Strike File Photo
भंडारा

Bhandara Lightning Strike | गुरे चारताना वीज कोसळून गुराखी महिला जागीच ठार

राजुली जंगलातील दुर्दैवी घटना; मऱ्हेगाव (नवीन) येथील महिलेचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

Woman Herder Dies Lightning Bhandara

भंडारा : गुरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वीज कोसळून तिचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि.१०) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास राजुली (देवरी/गोंदी) जंगल परिसरात घडली. उत्तरा उत्तम थेर (४७), रा. मऱ्हेगाव (नवीन), ता. लाखनी असे मृत महिलेचे नाव आहे.

मऱ्हेगाव येथील गुराखी नेहमीप्रमाणे गावालगतच्या राजुली जंगलात गुरे चारण्यासाठी गेले होते. उत्तरा थेर या देखील सोमवारी दुपारनंतर गुरे घेऊन जंगलात गेल्या होत्या. दरम्यान, अचानक वातावरणात बदल होऊन विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर जोरदार पावसासह वीज कोसळल्याने उत्तरा यांना विजेचा जबर धक्का बसला आणि त्या जागीच कोसळल्या.

सोबत असलेल्या गुराखींनी तत्काळ मदतकार्य करीत प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. खात्री करण्यासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालय, पालांदूर येथे आणण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT