भंडारा: पुढारी वृत्तसेवा : वडिलाचा खून केल्यानंतर कारागृहातून बाहेर आलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अड्याळ पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या फनोली गावात घडली. दुर्योधन शंकर कावळे (वय ३५, रा.फनोली) असे मृताचे नाव आहे. (Bhandara Crime News)
दुर्योधन याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, दुर्योधन कावळे याला दारुचे व्यसन होते. त्याचा स्वभाव उद्धट आणि रागीट होता. त्याने आपल्या वडिलांचा खून केला होता. त्यामुळे त्याला कारागृहात जावे लागले होते. तेव्हापासून तो तणावात राहत होता. याच तणावातून १३ जानेवारीरोजी त्याने घरी कुणीही नसताना नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. (Bhandara Crime News)
दरम्यान, दुर्योधनची पत्नी शेतावरुन घरी परत आली असता त्यांने गळफास लावलेल्या स्थितीत दिसला. तिने आरडाओरड केल्यानंतर शेजारी धावून आले. पोलिस पाटलांनी अड्याळ पोलिसांना सूचना दिली. ठाणेदार धनंजय पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पत्नीच्या तक्रारीवरुन अड्याळ पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून तपास सहाय्यक फौजदार सुभाष मस्के करीत आहेत. (Bhandara Crime News)