Bear Attack  Pudhari
भंडारा

Bhandara Bear Rescue : अड्याळ शहरात अडीच तासांच्या थरारक मोहिमेनंतर अस्वलाला जेरबंद करण्यात यश

पवनी तालुक्यातील अड्याळ शहरालगतच्या नागरी वस्तीत अस्वलाचा शिरकाव

पुढारी वृत्तसेवा

Pawni Adyal Bear Rescue

भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ शहरालगतच्या नागरी वस्तीत अस्वलाने शिरकाव केल्याने शनिवारी (दि.७) पहाटे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. प्रशांत करंजेकर यांच्या घरामागील शेतात असलेल्या झाडावर अस्वलाने ठाण मांडले होते.

मात्र,वनविभागाच्या चपळाईने आणि 'डॉट' मारून अस्वलाला बेशुद्ध केल्याने मोठा अनर्थ टळला. आज सकाळच्या सुमारास प्रशांत करंजेकर यांच्या घरामागील शेतातील झाडावर एक अस्वल चढल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. वस्तीच्या इतक्या जवळ अस्वल असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच अड्याळचे सरपंच आणि उपसरपंच यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर लक्ष ठेवले आणि वनविभागाला पाचारण केले.

वनपरिक्षेत्र अड्याळचे कर्मचारी व भंडारा येथील 'जलद बचाव दल' (RRT) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अस्वलाला खाली उतरवण्यासाठी वनविभागाच्या पथकाने अत्यंत सावधगिरीने अस्वलाला 'डॉट' मारून बेशुद्ध केले. अस्वल बेशुद्ध झाल्यानंतर, त्याला सुरक्षितरीत्या खाली उतरवण्यासाठी झाडाच्या फांद्या कापण्यात आल्या.

खाली उतरवल्यानंतर अस्वलाला तातडीने पिंजऱ्यात हलवण्यात आले.अस्वलावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात (जंगलात) सुरक्षितरीत्या सोडण्यात येईल. या यशस्वी मोहिमेमुळे अड्याळवासीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT