Accident Pudhari
भंडारा

Bhandara Accident : पवनीजवळ भीषण अपघात, एसटी बस-दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील जुनोना-शिवनाळा मार्गावर एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मांगली-पवनी मार्गावर आज दुपारच्या सुमारास घडली.

मुरलीधर रामराव कोसेकर (वय ५०) हे दुचाकीने प्रवास करीत असताना मांगलीवरून पवनीकडे जाणाऱ्या एसटी बसशी (क्र. एमएच ४० वाय ५२९६) त्यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कोसेकर हे गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमी मुरलीधर कोसेकर यांना पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले; परंतु वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

घटनेची माहिती मिळताच पवनी पोलिसांचा ताफा तातडीने घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT