Bhandara sexual assault minor girls Pudhari
भंडारा

Bhandara Crime | शिक्षकी पेशाला काळीमा: शाळेत शिक्षकाकडून ५ मुलींसोबत लैंगिक कृत्य

पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील घटनेने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Bhandara sexual assault minor girls

भंडारा : भंडारा जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाने शाळेतील पाच लहान मुलींसोबत अश्लील कृत्य केले. पालकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी शिक्षकाला मंगळवारी (दि.१०) अटक केली आहे.

समाजाला लाजवेल अशी घटना आज पवनी तालुक्यात घडली आहे. पुढची पिढी घडविणाऱ्या शिक्षकानेच आपल्या शाळेतील पाच मुलींसोबत लैंगिक अत्याचार केलं आहे... पवनी तालुक्यातील वडेगाव येथे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अनिल राऊत हा मागील पाच वर्षांपासून कार्यरत आहे.

त्यांनी शाळेतील पाच लहान मुलींसोबत लैंगिक कृत्य केले. याबाबत वाच्यता कुणाकडे केल्यास तर जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती. अखेर एका मुलींनी याबाबत आपल्या पालकांना सांगितले. ही बाब खूपच धक्कादायक असल्याने पालकांनी आरोपी शिक्षकाला चांगलाच चोप दिला. व लगेच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनेचा गांभीर्य लक्षात घेत आरोपी शिक्षकाला अटक करत पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT