Accident News Pudhari
भंडारा

Bhandara Accident | पवनी मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार, एक जखमी

पालोरा चौरास येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

Pauni road two killed in accident

भंडारा: दुचाकीवरुन जाणाऱ्या तिघांना भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा गंभीर जखमी झाला. ही घटना पवनी मार्गावरील पालोरा चौरास येथे मंगळवारी (दि.१४) सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
धनंजय गजानन भानारकर (वय ३८) रा.पिंपळगाव निपानी आणि राजेश चेपा गजभिये (वय ४५) रा.बोरगाव/खांबाडी अशी मृतांची नावे आहेत.

धनंजय भानारकर हा त्याचे सहकारी मित्र सचिन नारायण गाडेकर रा. पिंपळगाव निपानी व राजेश चेपा गजभिये यांच्यासह मोटारसायकल क्र. एमएच ३१ बी. वाय. ९९२३ ने पवनी येथे जात असताना पालोरा चौरास येथे मागेहून येणाºया अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरात धडक दिली. यात धनंजय भानारकर व राजेश गजभिये यांचा मृत्यू झाला. तर सचिन गाडेकर हा गंभीर जख्मी झाला.

याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जयराम चव्हाण करीत आहेत. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT