भंडारा

Bhandara News | ११ हजार व्होल्टच्या धक्क्याने वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू!

दुरुस्तीचे काम करताना दुर्घटना; महावितरणच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

भंडारा: पवनी तालुक्यातील भोजापूर येथे ११ हजार व्होल्टच्या उच्चदाब वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा जोरदार धक्का बसून महावितरणच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि.२७) सकाळी सुमारे ८ वाजता घडली. अश्विन लोणारे (४५) असे मृत कर्मचाºयाचे नाव आहे. या घटनेमुळे वीजवाहिनीवर काम करताना सुरक्षा उपाययोजनांचे पालन करण्यात आले होते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शेडी/सोमनाळा परिसरातील ढोरप गावाच्या वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळाल्यानंतर लोनारे हे दुरुस्तीच्या कामासाठी भोजापूर येथे गेले होते. बंद असलेले एबी स्विच सुरू करण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक ११ हजार व्होल्टच्या वाहिनीतील विद्युतप्रवाहाच्या संपर्कात ते आले. परिसरातील जमीन ओली असल्याने विजेचा धक्का अधिक तीव्र बसल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेच्या वेळी तेथून जाणाºया एका महिलेच्या निदर्शनास हा प्रकार आला. तिने तातडीने ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत लोणारे यांना उपचारासाठी पवनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
महावितरणचे कार्यकारी अभियंता समीर डेकाटे आणि उपकार्यकारी अभियंता राजन निमजे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT