Leopard Attack Pudhari
भंडारा

Bhandara Leopard Attack : धोप येथे बिबट्याची दहशत; शेतात काळविटाची शिकार

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : कांद्री वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या धोप येथे बिबट्याने एका काळविटाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

धोप येथील शेतकरी बहादूर ठाकरे हे आज सकाळी आपल्या शेतात गेले असता, त्यांना त्यांच्या शेतात एक काळवीट मृत अवस्थेत आढळून आले. याबाबतची माहिती मिळताच माजी सभापती जगदीश शेंडे यांनी तात्काळ वन विभागाला याची सूचना दिली. वन विभागाची रॅपिड रिस्पॉन्स टीम (आरआरटी), सहाय्यक वनक्षेत्र अधिकारी व अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी पंचनामा करून पाहणी केली असता, घटनास्थळी बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. तसेच मृत काळविटाचा मागील भाग अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत होता, त्यामुळे बिबट्यानेच ही शिकार केल्याचे निश्चित झाले.

घटनास्थळी मृत काळविटाला खड्डा खोदून नियमानुसार दफन करण्यात आले. या परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे वन विभागामार्फत शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच शेतकरी व नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क राहावे, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT