Bhandara Guardian Minister Pankaj Bhoyar
भंडारा: भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांना बदलून त्यांच्याऐवजी गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. शासनाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांच्या स्वाक्षरीनिशी हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
जिल्ह्याचे मावळते पालकमंत्री संजय सावकारे यांच्यावर बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. शासनाच्या आदेशामध्ये प्रशासकीय कारणास्तव बदलीचे कारण नमूद करण्यात आले आहे. संजय सावकारे यांच्याकडील पालकमंत्रीपदाची जबाबदारी काढून टाकल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.