Bee Attack Pudhari
भंडारा

Bee Attack Bhandara | मधमाशांच्या हल्ल्यात दिव्यांगाचा मृत्यू; पळता न आल्याने स्वत:चा बचाव करण्यात अपयशी

साकोली तालुक्यातील एकोडी येथे मुख्य चौकात मधमाशांचा हल्ला

पुढारी वृत्तसेवा

Disabled man death Bhandara
भंडारा: साकोली तालुक्यातील एकोडी येथे मुख्य चौकात मधमाशांच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लिंबराज बालाजी रहांगडाले (वय ५०, रा. एकोडी) असे मृताचे नाव असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकोडी गावातील पाण्याच्या टाकीजवळ तसेच मुख्य चौक व बसस्थानक परिसरात अचानक मधमाशांनी हल्ला चढविला. हा परिसर नेहमीच नागरिकांच्या वर्दळीचा असल्याने अनेकजण या हल्ल्याच्या कक्षेत आले. यावेळी लिंबराज रहांगडाले हे दिव्यांग असल्यामुळे स्वत:चा बचाव करू शकले नाहीत. मधमाशांच्या झुंडीने घेरल्याने ते प्रचंड घाबरले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या हल्ल्यात तारकेश रघुनाथ कोल्हे हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. इतर काही नागरिकांनाही मधमाशांचा फटका बसला, मात्र त्यांनी वेळेवर सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत प्रकरण नोंदविले आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून तो कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. या घटनेनंतर गावात भीतीचे सावट पसरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT