भंडारा ; प्रेमजाळ्यात ओढून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला रिसॉर्टवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेबाबत पीडित मुलीने केलेल्या तक्रारीवरून, अड्याळ पोलिसांनी शनिवार, ४ एप्रिल रोजी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यानंतर त्याला अटक केली आहे.
आरोपीची ओळख साजिद शेख (२१) अशी पटली असून, तो भंडारा येथील महिला समाज शाळा परिसरातील रहिवासी आहे. पीडित मुलगी भंडारा शहरातीलच एका शाळेत शिकणारी विद्यार्थिनी आहे. तिची आणि साजिद शेखची गेल्या तीन वर्षांपासून ओळख होती. सन २०२४ मध्ये, साजिदने त्या मुलीला प्रपोज केले.
सोमवार, ३० मार्च २०२६ रोजी त्याने त्या अल्पवयीन मुलीला शहरातील गांधी चौकात भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर तो तिला अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमन रिसॉर्टवर घेऊन गेला. तिथे साजिद शेखने त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. पीडित मुलीने या घटनेची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली, त्यानंतर अड्याळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी रीतसर तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी 'भारतीय न्याय संहिता' तसेच 'पॉक्सो' कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.