भंडारा

Bhandara Crime : ‘लग्न करतो’ म्हणत सहा वर्षे शोषण; महिलेच्या तक्रारीवरून तरुणाला अटक

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : पतीच्या निधनानंतर मुलासह सासरी वास्तव्यास असलेल्या विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून सहा वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी प्रतीक सोमेश्वर नागोसे (वय २८) याच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

प्रतीक हा एका मोबाइल दुकानात काम करीत होता. पीडित महिलेच्या पतीने याच दुकानातून मोबाइल खरेदी केला होता. पतीच्या निधनानंतर मोबाइलच्या हप्त्याची काही रक्कम थकीत होती. ही रक्कम वसूल करण्याच्या अनुषंगाने पीडित महिला आणि प्रतीक यांच्यात ओळख झाली. पुढे या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पीडितेच्या आरोपानुसार, आरोपीने तिला लग्नाचे आश्वासन देत मागील सहा वर्षांत वेळोवेळी लैंगिक शोषण केले. या कालावधीत पीडितेला सुमारे सहा ते सात वेळा गर्भधारणा झाली. प्रत्येक वेळी आरोपीने औषध देऊन गर्भपात करण्यास भाग पाडल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

सुमारे १५ दिवसांपूर्वी आरोपीने पुन्हा अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला. त्यानंतर तिने आरोपीकडे लग्नाची मागणी केली. मात्र, आरोपीने लग्न करण्यास नकार दिल्याने अखेर महिलेने लाखांदूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी प्रतीक नागोसे याच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार शिरीष भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT