Crime News Pudhari Photo
भंडारा

Bhandara Crime | भंडारा येथील ज्वेलर्स फसवणूक प्रकरणाचा उलगडा!

उत्तरप्रदेशातील तिघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

भंडारा :  सोन्याचांदीच्या शुद्धतेची पारख असलेल्या सराफा व्यापाऱ्यालाच भामट्यांच्या टोळीने गंडा घातल्याची घटना लाखांदूर शहरात उघडकीस आली. ग्राहकाच्या वेशात आलेल्या भामट्यांनी नकली चांदी विकून २० हजार रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी कारवाई करत उत्तरप्रदेशातील तिघांना अटक केली.

लाखांदूर येथील हाडगे ज्वेलर्समध्ये १९ जून रोजी दोन अनोळखी व्यक्ती ग्राहक म्हणून आल्या. त्यांनी १९४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने विक्रीसाठी दाखविले. सुरुवातीला संशय आल्याने व्यापारी पंकज तुलसीदास हाडगे यांनी दागिने खरेदी करण्यास नकार दिला. मात्र आरोपींनी मुरादाबाद येथील बनावट बिल व आधारकार्ड दाखवून तसेच भावाला पैशांची गरज असल्याचे सांगून व्यापाऱ्याचा विश्वास संपादन केला. हाडगे यांनी दागिने खरेदी करून २० हजार रुपये फोन पेद्वारे पाठविले.

दुसऱ्या दिवशी नातेवाइकांकडून मिळालेल्या व्हॉट्सअॅप संदेशावरून आणि दागिन्यांची तपासणी केल्यावर ते नकली असल्याचे स्पष्ट झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पंकज हाडगे यांनी लाखांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या आधारे २३ जून रोजी तिघांना अटक केली. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष चव्हाण यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT