करण संजय मलेवार Pudhari
भंडारा

Bhandara Accident | भरधाव कारच्या धडकेत २१ वर्षीय युवक ठार

बेला येथे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर अपघात; दुचाकीवरील अन्य १ जखमी

पुढारी वृत्तसेवा

Bela National Highway Accident
भंडारा:
बेला येथील जुन्या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने करण संजय मलेवार ( वय २१, रा. नेरी) याचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री सुमारे ९.३० वाजता जिल्हा परिषद शाळेजवळ हा अपघात घडला. दुचाकीवरील अन्य एक युवक जखमी झाला. या घटनेने नेरी गावावर शोककळा पसरली आहे.

करण काही कामानिमित्त मित्रासह दुचाकीने जवाहरनगर येथील पेट्रोलपंपाकडे जात होता. त्याचवेळी नागपूरच्या दिशेने जाणाºया कारने त्याच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर दुखापत झाल्याने करणचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील राहुल गभने (२२) हा किरकोळ जखमी झाला. करण हा जिल्हा परिषद सभापती आनंद मलेवार यांचा पुतण्या होता. तो आयटीआयचे शिक्षण घेत होता. कुटुंबातील एकुलता एक मुलगा असलेल्या करणच्या मृत्यूने आई-वडील आणि लहान बहिणीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

चौपदरीकरणाचे काम संथ

बेला येथील जुन्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या खड्ड्यामुळे हा अपघात झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वर्षभरापासून संथ गतीने सुरू असून, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. रस्त्यावरील खड्डे आणि सुरू असलेल्या कामामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.  या पार्श्वभूमीवर महामार्गावरील कामाला गती देऊन वाहतूक सुरक्षित करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT