भंडारा

भंडारा : डोकेसरांडी येथे एकाच दिवशी निघाली बाप लेकाची अंत्ययात्रा 

backup backup
भंडारा; पुढारी वृत्तसेवा : नियतीचा खेळ किती निर्दयी असतो याचा प्रत्यय आज लाखांदूर तालुक्यात आला. एकाच दिवशी खरकाटे कुटुंबातील बाप लेकाची अंतयात्रा निघाली. इकडे वडिलांची अंतयात्रा निघाली आणि तिकडे मुलाने दवाखान्यात प्राण सोडला. ही घटना आहे लाखांदूर तालुक्यातील डोकेसरांडी येथील. आज १८ मार्च रोजी वयोवृध्द वडिलांच्या अंतयात्रेनंतर अवघ्या तीन तासांनी मुलाची अंतयात्रा काढावी लागली. वडील रतिराम इस्तारी खरकाटे हे वयोवृद्ध होते तर मुलगा सहादेव रतिराम खरकाटे वय अंदाजे (वय ५५ वर्षे) अशी त्या मृत बाप लेकाची नावे आहेत.
अधिक माहितीनुसार, लाखांदूर तालुक्यातील डोकेसरांडी येथील खरकाटे कुटुंबावर नियतीने आघात केला आहे. येथील रतिराम खरकाटे हे वयोवृद्ध असल्याने दि.१७ मार्च रोजी दुपारी त्याचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रम दुसऱ्या दिवशी म्हणजे १८  मार्च रोजी सकाळी ११ वाजता नियोजित होते. दरम्यान, वडिलांची अंतविधी काढण्यात तयारीत असताना मुलगा सहादेव खरकाटे याला घरीच अचानक चक्कर आला आणि तो खुर्चीवरून खाली पडला. इकडे वडिलांची अंतयात्रा काढण्याची तयारी तोच मुलगा चक्कर येऊन पडल्याने तत्काळ त्याला लाखांदूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दवाखान्यात उपचारादरम्यान त्या मुलाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर इकडे मुलाला दवाखान्यात दाखल केले असताना तिकडे वडिलांची अंतयात्रा निघाली.
मुलाला वडिलांचे शेवटचे दर्शन सुद्धा घेता आले नाही. वडीलांपाठोपाठ मुलाचाही मृत्यू झाल्याने अवघ्या 3 तासांच्या अंतराने मुलाचीही अंतयात्रा काढली गेली. स्थानिक डोकेसरांडी येथील स्मशानभूमीत बाप लेकाच्या पार्थिवावर अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडला. या घटनेने गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे
SCROLL FOR NEXT