प्रातिनिधिक छायाचित्र.  Representative image
भंडारा

Bhandara News | अड्याळ ग्रामपंचायतीत लाखोंचा घोटाळा: सरपंचावर गुन्हा दाखल

निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात हेतुपुरस्सर खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती

पुढारी वृत्तसेवा

Adyal Gram Panchayat Scam

भंडारा: पवनी तालुक्यातील अड्याळ ग्रामपंचायतीच्या सरपंचाने आपल्या पदाचा दुरुपयोग करून लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचे आणि निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्रात खोटी माहिती दिल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या गंभीर प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, अड्याळ पोलिसांनी सरपंचावर गुन्हा दाखल केला आहे.

शिवशंकर सेगोजी मुनगाटे (वय ६०) असे या आरोपीचे नाव आहे. १ डिसेंबर २०२२ रोजी सरपंचपदासाठी नामनिर्देशन अर्ज भरताना त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात हेतुपुरस्सर खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सरपंचपदावर असताना मुनगाटे यांनी आर्थिक अनियमिततेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. ‘प्रनिश ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल’ या स्वत:च्याच व्यावसायिक फर्मचा त्यांनी गैरवापर केला. ग्रामपंचायत निधीतून प्राप्त झालेली तब्बल ४३ लाख ५९ हजार ७६६ रुपयांची मोठी रक्कम हडपण्यासाठी, त्यांनी स्वत:च्याच मालकीच्या ‘प्रनिश ट्रेडर्स’च्या नावाने बिले तयार केली.

ही बिले ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डवर दाखवून त्यांनी सरकारी तिजोरीची फसवणूक केली. या घोटाळ्याची माहिती मिळताच चिंतामण शेषराव वाघमारे (वय ३७) यांनी अड्याळ पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी शिवशंकर मुनगाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक तायवाडे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT