भंडारा; पुढारी वृत्तसेवा
भजनी मंडळींना घेऊन जाणारे वाहन नाल्यात कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना आज शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास साकोली तालुक्यातील खांबा जांभळी येथे घडली.
भजनी मंडळींना घेऊन जाणारे एक मिनी मॅक्स वाहन पुलावरून नाल्यात कोसळून अपघात झाला. या घटनेत साधारणतः १३ इसम किरकोळ जखमी झाले आणि २ लहान मुली पाण्यात वाहून गेल्या आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे.
घटनास्थळी तहसीलदार आणि नायब तहसीलदार, पोलीस उपस्थित आहेत. वाहून गेलेल्या मुलींचा शोध घेण्यात येत आहे.