भंडारा

भंडारा : सौरउर्जा आणि पथदिव्यांचे कंत्राट देण्याचे आमिष देऊन ३३ लाखांचा गंडा

backup backup

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : शहरातील सत्कार नगर, गणेशपुर येथील विवाहीत महिलेला सौर उर्जा आणि पथदिवे लावण्याचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून ३३ लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

महिलेच्या तक्रारीवरुन बुलढाणा जिल्ह्यातील जनकल्याण आर्थिक विकास निधीच्या महिला संचालक, राजेश जानीकराव वाहुरवाघ, संदीप समाधान खरात (रा.चिखली जि.बुलढाणा), रिजनल मेंबर घनश्याम (दिगांबर मडावी रागोलेवाडी जि. भंडारा) यांच्यावर भंडारा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार या सर्व व्यक्तींनी महिलेला अटल ज्योती सौर उर्जा व स्ट्रिट लाईट लावणे व घरगुती विद्युत बदलविण्याचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष देऊन तिच्याकडून ३३ लाख ५० हजार रुपये घेतले आहे. याविरोधात महिलेने फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे.

SCROLL FOR NEXT