अफूच्या टरफलाची तस्करी करताना दोन युवकांना ताब्यात घेण्यात आले. (Pudhari File Photo)
भंडारा

Opium Smuggling Case | ३०७ किलो अफूच्या टरफलाची तस्करी

Crime Branch Operation | परप्रांतीय दोन आरोपी अटकेत, गुन्हे शाखा आणि जवाहरनगर पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

307 kg Opium Husk Seizure

भंडारा: राष्ट्रीय महामार्गावरील शहापूर परिसरातील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या दोन युवकांकडून नशेकरिता वापरण्यात येणारे सुमारे ३०७ किलो अफूच्या टरफलाची तस्करी करताना दोन युवकांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि जवाहरनगर पोलिसांनी संयुक्तरित्या केली. सदर आरोपी एका खासगी वाहनातून राजस्थानमार्गे नागपूरहून भंडाराच्या दिशेने आले होते.

३०७ किलो अफूच्या टरफलाची तस्करी करणारे आरोपी शहापूर येथे एका हॉटेलमध्ये असल्याच्या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखा आणि जवाहरनगर पोलिसांनी संयुक्तरित्या हॉटेलमध्ये धाड टाकली. त्यावेळी आरोपी दिलीप गंगाराम बिश्नोई (२४) आणि जयप्रकाश सहीराम बिश्नोई (२५) रा. फलोदी जिल्हा जोधपूर, राजस्थान यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.

आरोपींनी वापरलेली गाडी ही एमएच २० एफवाय ९४१० क्रमांकाची चोरीची असून छत्रपती संभाजीनगर येथील शहर परिसरातील, दिनांक २८ जुलै रोजी एमआयडीसी वाळूज पोलिस स्टेशन छत्रपती संभाजी नगर येथून चोरीला गेली होती. सदर गाडीवर या अफूतस्करांनी  आरजे ४५ सीजे ६२०५ क्रमांकाची नंबरप्लेट लावून गाडी अफू तस्करीत वापरली आहे.

या गाडीमध्ये नशेच्या अफूचे टरफल जवळपास  १६ पोत्यांमध्ये कोंबून भरलेले आढळले. त्याचे वजन ३०७ किलो असून, २० हजार रुपये किलोप्रमाणे हा माल बाजारात विकला जातो. पोलिसांनी केलेल्या कारवाईनुसार ८५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मादक द्रव पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार सदर कारवाई करण्यात आली.

जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर, जवाहरनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार भिमाजी पाटील, उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड, भंडारा नायब तहसीलदार महादेव दराडे यांच्या  समक्ष कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT