विदर्भ

ATM Money : पाचशे काढताच निघू लागले अडीच हजार; एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी झुंबड

backup backup

नागपूर; वृत्तसंस्था : नागपूर जिल्ह्यातल्या खापरखेडा गावातील एटीएममध्ये अक्षरशः चमत्कार पाहायला मिळाला. ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी पाचशे रुपयांचा आकडा टाकला की, ते पैसे निघायचेच. सोबतच त्यानंतर जास्तीचे अडीच हजार रुपये बाहेर यायचे. त्यामुळे या एटीएमवर पैसे काढण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली.

खापरखेडा गावातील शिवा कॉम्प्लेक्समध्ये अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. या ठिकाणी हा प्रकार पाहावयास मिळाला. ही बातमी सगळीकडे पसरली. याचा फायदा अनेकांनी घेत पैसे काढले. विशेष म्हणजे, या एटीएमवर पैसे काढल्यानंतर बँकेतून मोबाईलवर 500 वरील रकमेचा कोणताही मेसेज संबंधितांना आला नाही.

उपलब्ध माहितीनुसार, सिल्लेवाडा येथील एक तरुण एचडीएफसीच्या एटीएममधून दहा हजार रुपये काढून परत जात होता. तेव्हा कोराडी येथील एक युवक त्याच्याजवळ आला. त्याने त्याला 500 रुपये मागून 1 हजार रुपये देतो, असे सांगितले. तरुणानेही त्याला पैसे दिले. यानंतर तो युवक एटीएममधून अडीच हजार रुपये घेऊन आला आणि तरुणाने त्यातील हजार रुपये दिले. त्याने सर्व प्रकार सांगून पैसे काढून दाखविले.पोलिसांनी बँक अधिकार्‍यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर बँक अधिकार्‍यांनी बुधवारी तिथे पोहोचून एटीएमची तपासणी केली. दरम्यान, किती नागरिकांनी अशाच पद्धतीने पाचशे रुपयांचे विड्रॉल टाकून अडीच हजार रुपये नेले आहेत, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, पैसे काढणार्‍या एटीएमधारकांचा डेटा काढून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात येतील, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT