प्रातिनिधी छायाचित्र File Photo
अमरावती

अमरावती : कापूसतळणी येथे मृत स्त्री अर्भक आढळले, गावात खळबळ

Amravati News | रहीमापूर पोलिसांकडून तपास सुरु

पुढारी वृत्तसेवा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: अंजनगाव सर्जी तालुक्यात कापूसतळणी येथे शनिवारी (दि.१५) सकाळच्या सुमारास मृत स्त्री अर्भक आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली.

कापूसतळणी गावाला लागूनच असलेल्या रत्नापूर रस्त्याच्या बाजुला खंडेलवाल ले आउट मध्ये शनिवारी पहाटे चार ते पाच वाजताच्या सुमारास कुण्यातरी अज्ञात व्यक्तीने मृत स्त्री अर्भक आणून टाकले. सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

घटनेची माहिती रहीमापूर पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी अनिता खेडकर दाखल झाले होते. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृत अर्भकास उत्तरीय तपासणीकरीता ग्रामिण रुग्णालय, अंजनगाव येथे पाठविण्यात आले. सरकारी दवाखान्यातील गरोदर मातेच्या नोंदीचा शोध घेऊन स्त्री भ्रूण हत्या करणार्‍यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनंत वडतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT