rain news  file photo
अमरावती

Vidarbha Rainfall deficit : १८ वर्षांत प्रथमच विदर्भात अल्पवृष्टी, ११ जिल्ह्यांत पावसाची मोठी तूट

अमरावती : केवळ ६८७ मिमी पाऊस.. अमरावती, अकोला, वाशीमसह ६ जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : विदर्भात गेल्या १८ वर्षांत प्रथमच संपूर्ण पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. ४ महिन्यांच्या पावसाळ्यात विदर्भातील ११ जिल्ह्यांत सरासरी ९३७ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ६८७ मिमी पाऊस झाला. म्हणजेच तब्बल २६ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे.

यंदाच्या पावसाळ्यावर एल निनोचा प्रभाव असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचा थेट फटका खरीप पिकांना बसला असून शेतकऱ्यांसमोरील संकट अधिक गडद झाले आहे.

अकोला जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे अवघा ४०७ मिमी, तर अमरावतीत ४७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वाशीम, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूरमध्येही पावसाची मोठी तूट आहे. विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यात मात्र सरासरीच्या आसपास १२०६ मिमी पाऊस झाला आहे.

दरम्यान, २००९ मध्ये विदर्भात ६५४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर यंदाचा पाऊस गेल्या १८ वर्षांतील सर्वात कमी ठरला आहे. म्हणजेच यंदाचा पावसाळा संपला असला तरी विदर्भातील शेतकऱ्यांसमोरील पाण्याचे आणि शेतीचे संकट मात्र कायम आहे.

विदर्भात पावसाची मोठी तूट, ६ जिल्ह्यांत चिंताजनक परिस्थिती -

१. अमरावती - ४७२ मिमी. तूट ४२%

२. अकोला - ४०७ मिमी. तूट ४१%

३. वाशीम - ४८८ मिमी. तूट ३६%

४. वर्धा - ५५२ मिमी. तूट ३४%

५. नागपूर - ६२१ मिमी. तूट ३३%

६. चंद्रपूर - ७१८ मिमी. तूट ३३%

७. यवतमाळ - ५९३ मिमी. तूट २६%

८. बुलढाणा - ५११ मिमी. तूट २०%

९. गडचिरोली - १०८२ मिमी. तूट १५%

१०. भंडारा - ९११ मिमी. तूट १५%

११. गोंदिया - १२०६ मिमी. जवळपास सरासरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT