शिरजगाव कसबा-देऊरवाडा रस्त्यावरील अपघात File Photo
अमरावती

दोन दुचाकींच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एका विद्यार्थ्याचाही समावेश

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात शिरजगाव कसबा-देऊरवाडा रस्त्यावर वीटभट्टीजवळ शनिवारी (दि.५) दुचाकींच्या झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर दोन तरुण गंभीर जखमी आहेत. मृतकांमध्ये एका विद्यार्थ्याचा देखील समावेश आहे. कुणाल नरेश भुते (वय १८) व शेख मुस्ताक शेख गैसुद्दीन (वय ३२, दोन्ही रा. देऊरवाडा अशी मृतांची नावे आहेत. अपघातातील जखमींमध्ये विनोद रामकृष्ण फिस्के (वय ३५, रा. देउरवाडा) व सारंग नामदेव संभे (वय १८, रा. शिरजगाव कसबा) यांचा समावेश आहे.

दुचाकी चालकाकडे मागितली लिफ्ट

माहितीनुसार, दुचाकी (क्र.एमएच २७ डीके १७९७) आणि दुसरी दुचाकी क्र (एमएच २७ बीए ४७३४) या दोन्ही दुचाकींवर प्रत्येकी दोन युवक आपआपल्या कामानिमीत्त जात होते. दरम्यान शिरजगाव कसबा-देऊरवाडा रस्त्यावरील अकोटकर यांच्या शेतातील वीटभट्टीजवळ वळण मार्गावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जण जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT