तळेगाव जवळ टायर फुटल्यामुळे ट्रकला आग लागली.  Pudhari
अमरावती

Samruddhi Mahamarg Accident | समृद्धी महामार्गावर टायर फुटल्याने ट्रकला आग, दोघे ठार

तळेगाव जवळ भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

Amravati Talegaon Accident News

अमरावती : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. सोमवारी (दि. १२) तळेगाव जवळ टायर फुटल्यामुळे ट्रकला आग लागली. त्यानंतर झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तर एकाने वाहनातून उडी घेऊन स्वतःला वाचवले. ट्रक चालक इखलास खान शहाबुद्दीन खान (वय २२, रा. रानीआला खुर्द, हरियाणा) व जाहूल खान अली खान (वय २५, रा. रानीआला खुर्द, हरियाणा) असे अपघातातील मृतकांची नावे आहे. 

माहिती नुसार, ट्रक क्रमांक आरजे-११ / जीसी-९३८३ हा ट्रक पानकोबी घेऊन नाशिकहून पटना येथे जात होता. सकाळी सुमारे ५ वाजता चॅनल नंबर १२७+३०० जवळ ट्रकच्या ड्रायव्हर साईडचा पुढचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक क्रॉस बॅरियरला धडकून घासत पुढे गेला. या धडकेत डिझेलची टाकी फुटली आणि वाहनाने पेट घेतला.

या अपघातात ट्रक मध्ये असलेला क्लीनर साहिब सईद खान (वय १८, रा. रानीआला खुर्द, पलवल, हरियाणा) याने प्रसंगा वधान राखून ट्रकमधून उडी मारून आपला जीव वाचवला. त्याला कोणतीही दुखापत झाली नाही.परंतु, ट्रकमधील जाहूल खान अली खान (वय २५, रा. रानीआला खुर्द) हा ट्रक सह पुलाच्या खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

तर ट्रक चालक इखलास खान शहाबुद्दीन खान (वय २२, रा. रानीआला खुर्द, हरियाणा) हा ट्रकमध्ये जळून ठार झाला. घटनेची माहिती समृद्धी महामार्ग नियंत्रण कक्षाला मिळताच हेडकॉन्स्टेबल संतोष गहिरवार व वाजिद शेख यांनी तळेगाव दशासर पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक सुधीर गावंडे, कुंदन राठोड व वीरेंद्र तराळे यांनी घटनास्थळी पोहोचून मदत व बचाव कार्य केले.

अग्निशमन दलाला बोलावून ट्रकची आग विझवण्यात आली.फायर ब्रिगेडचे प्रभारी अधिकारी आवटे व त्यांचा स्टाफ घटनास्थळी हजर झाले. या प्रकरणी तळेगाव दशासरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण ओटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सुरेश जाधव, मनीष कांबळे पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT