बडनेरातून तीन बालकामगारांची सुटका  Pudhari News network
अमरावती

बडनेरातून तीन बालकामगारांची सुटका

संचालकावर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंडेश्वर रोड येथील पंचारे ब्रिक्स आस्थापनात काम करणार्‍या तीन बाल कामगारांची कामगार उपायुक्त कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी सुटका केली आहे. याप्रकरणात शिवराज मारोती नेने यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अनिल सूर्यभान पंचारे (वय ३६, रा. पवननगर, नवीवस्ती, बडनेरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोंडेश्वर मार्गावरील पंचारे ब्रिक्स येथे बाल कामगार काम करत असल्याची माहिती कामगार उपायुक्त कार्यालयाला मिळाली होती. त्याआधारे १५ जानेवारी रोजी अधिकारी शिवराज मारोती नेने यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांनी प्रतिष्ठानवर छापा टाकला. यावेळी आस्थापनेत तीन बालकामगार काम करताना दिसले. त्यानंतर निरीक्षक शिवराज मारोती नेने यांनी बडनेरा पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आस्थापना संचालक अनिल सूर्यभान पंचारे यांच्याविरुद्ध कलम १४६, बाल संगोपन व संरक्षण कायदा २०१५ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT