Death by Drowning in a Lake Pudhari
अमरावती

Drowning death | सिपना नदीत दोन सख्या बहिणींचा बुडून मृत्यू 

धारणी परिसरातील या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : धारणीजवळील दिया गावात रविवारी (दि.५) एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. सिपना नदीत बुडून दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत मुलींची नावे आस्था आनंद गिरी (वय १२) आणि अनु आनंद गिरी (वय १४) अशी आहेत. दोघीही सख्या बहिणी होत्या. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्या गावातील इतर काही मुलांसोबत नदीवर पोहण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी आस्था हिला पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली. हे पाहून तिची मोठी बहीण अनु हिने तिला वाचवण्यासाठी लगेच नदीत उडी घेतली. मात्र, दोघींनाही पाण्याचा जोर सहन करता आला नाही आणि त्या दोघींचा बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच गावकरी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी व स्थानिकांच्या मदतीने दोघींचे मृतदेह बाहेर काढले आणि धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे आनंद गिरी यांच्या कुटुंबावर मोठे दुःख ओढवले असून गावात शोककळा पसरली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT