अमरावती, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात समाजवादी पक्ष आगामी निवडणुकांमध्ये स्वतंत्र असून आमची कोणाशीही युती नाही. लोकसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष उमेदवारांना आम्ही पाठिंबा देऊ आणि त्यांच्या सोबत राहू अशी भूमिका समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी रविवारी (दि.३) अमरावती येथे पत्र परिषदेत स्पष्ट केली.
उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पक्ष इंडिया आघाडीमध्ये सहभागी आहे. महाराष्ट्रात आम्ही स्वतंत्र आहोत. राज्यात आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिला आहे असेही अबू आझमी म्हणाले.
सध्या जाती-जातीत आणि धर्मा-धर्मात तेढ निर्माण केली जात आहे. संविधान विरोधी लोक सत्तेत आहेत. त्यांना रोखण्यासाठीच संविधान बचाव- देश बचाव यात्रा सुरू करण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कुठलेही सरकार आले तरी शेतकरी आत्महत्या अद्यापही कमी झालेल्या नाही. देशातील कर्ज चार पटीने वाढले आहे तर दुसरीकडे उद्योगपतींचे कर्ज सरकार माफ करते आहे. देशातील गरिबीचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. सरकार या सर्व प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत. देशात हिंदू- मुस्लिम दरी निर्माण करून धार्मिक द्वेष पसरविला जात आहे अशा आशयाचे विधान करून त्यांनी भाजपवर टीका केली.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.