Navneet Rana Death Threat from Pakistan
अमरावती : भाजपच्या स्टार प्रचारक तसेच अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी कॉलवरून देण्यात आली. आमच्याकडे तुझ्याबद्दल पूर्ण माहिती आहे. हिंदूशेरणी तुला काही दिवसांत आम्ही संपवून टाकू. ना सिंदूर राहील आणि ना सिंदूर लावणारी राहील, असे धमकीत म्हटले आहे.
पाकिस्तानातून वेगवेगळ्या नंबरवरून हे धमकी देणारे कॉल मध्यरात्रीनंतर आले आहे, अशी माहिती सोमवारी (दि.१२) समोर आली. या संदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. तसेच केंद्रीय एजन्सींना कळविण्यात आले आहे. यापूर्वी सुद्धा नवनीत यांना जीवे मारण्याचा धमक्या आल्या होत्या. सध्या नवनीत राणा यांना केंद्र सरकारची वाय दर्जाची सुरक्षा आहे.