Amravati crime news file photo
अमरावती

१९ वर्षीय तरुणीवर अत्याचार, मुख्य आरोपीसह दोन अल्पवयीन ताब्यात; अमरावतीच्या खोलापूर परिसरातील धक्कादायक घटना

Amravati crime news: या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, तिन्ही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Amravati crime news

अमरावती: जिल्ह्यातील खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. स्टेशनरी दुकानातून घरी परतणाऱ्या १९ वर्षीय तरुणीला घरात ओढून नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, या गुन्ह्यात एका तरुणासह दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

नेमकी घटना काय घडली?

पीडित तरुणी आणि आरोपी एकाच गावातील रहिवासी आहेत. सोमवारी, २८ जुलै रोजी पीडिता जवळच्या स्टेशनरी दुकानातून वही-पेन घेऊन घराकडे परतत होती. त्यावेळी मुख्य आरोपी विकास (वय २०) याने तिचा रस्ता अडवला आणि तिला जबरदस्तीने जवळच्या एका घरात ओढून नेले. तिथे त्याने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. यावेळी पीडितेने मदतीसाठी आरडाओरड केली, मात्र तिच्या मदतीला कोणीही धावून आले नाही. या घटनेवेळी आरोपी विकासचे दोन अल्पवयीन साथीदारही तिथे हजर होते. त्यांनी पीडितेसोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला.

पोलिसांची वेगवान कारवाई

या भयंकर प्रकारानंतर पीडितेने धाडस दाखवत सोमवारी खोलापूर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी विकास (२०) आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांविरोधात खालील कलमांनुसार गुन्हा दाखल केला:

  • कलम ३७६ (१): बलात्कार

  • कलम ३५४ (अ): विनयभंग

  • कलम ३४२ (३): चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवणे

  • कलम ५०६: जीवे मारण्याची धमकी

  • कलम ३४: समान उद्देशाने गुन्हा करणे

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी विकासला अटक करण्यात आली असून, दोन्ही अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात दहशत पसरली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खोलापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT