अमरावती, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील दर्यापूर पोलीस स्टेशन हद्दीत दोन अल्पवयीन मुलींवर ५० वर्षीय ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना शनिवारी (दि.१) दुपारच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी फिर्यादी आईच्या तक्रारीवरून शनिवारी सायंकाळी संशयित नराधमाविरुध्द दर्यापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ओमप्रकाश (वय ५०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
घटनेच्या वेळी दोन्ही बालिकांचे आई-वडील हे शेत शिवारात मोल मजुरीसाठी गेले होते. तर ४ वर्षीय व ८ वर्षीय दोन्ही बालिका खेळत होत्या. दरम्यान ग्रामपंचायत कर्मचारी असणार्या ओमप्रकाश याने दोन्ही बालिकेस एका घरात नेत मारहाण केली आणि अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार ग्रामस्थांच्या निर्दशनास येताच त्यांनी आरोपी ओमप्रकाश यास चांगलाच चोप दिला. याप्रकरणी बालिकेच्या आईने दर्यापूर पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी विनयभंग व पोस्कोअर्तगत गुन्हा दाखल करुन संशयित आरोपी ओमप्रकाश यास तातडीने अटक केली. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुनिल वानखडे यांच्या मार्गदर्शनात दर्यापूर पोलिस करीत आहेत.