One Young Man died in Road Accident At Bhishrora
श्याम राऊत याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. Reprentative Photo
अमरावती

भिश्नोरा फाट्यावर दुचाकीचा भीषण अपघात

करण शिंदे

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : तळेगाव-खडका मार्गावर दोन वाहनांचा अपघात झाल्याची घटना सोमवारी (दि.२४) घडली आहे, या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. आकाश उरकुडे (वय. 28) हा जखमी झाला आहे. तर श्याम श्रीकृष्ण राऊत (वय. 24) असे मृत युवकाचे नाव आहे.

या अपघाताची अधिक माहिती अशी. आकाश आणि श्याम हे दुचाकीवरुन काम सुरु असलेल्या ट्रॅक्टर करिता डिझेल आणण्यासाठी गेले होते. यावेळी अज्ञात दुचाकी क्रमांक (एमएच 32 -5480)ने त्यांच्या वाहनाला मागून जोरात धडक दिली. या धडकेत श्याम याचा जागीच मृत्यू झाला. दोघेही तारखेड येथील रहिवासी आहे.

स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती तळेगाव पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संदीप धोबी, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा पडनाटे, राहुल अमोने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून अपघातातील श्याम राऊत याचा मृतदेह नजीकच्या आर्वी येथील रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला. तर जखमी आकाश उरकुडे याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती तारखेड येथे पोहोचतात गावात सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.

SCROLL FOR NEXT