एकनाथ शिंदेंनी एक घाव केला, तर त्यांना परिणाम भोगावे लागतील ?: आ. बच्चू कडू  Pudhari Photo
अमरावती

CM एकनाथ शिंदेंनी घाव केला, तर त्यांना परिणाम भोगावे लागतील ?: आ. बच्चू कडू 

पुढारी वृत्तसेवा

अमरावती: प्रत्येकाचा राजकीय स्वार्थ असतो, त्यामुळे आमदार राजकुमार पटेल प्रहार ला सोडून जात असतील तर आम्हाला परवा नाही, त्यांनी सुखात राहावं. मात्र एकनाथ शिंदेंनी आम्हाला एक घाव केला आहे, आम्ही त्याच्या बदल्यात हजारो घाव देऊ असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी रविवारी (दि.६) दिला आहे. 

आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार चे मेळघाट विधानसभेचे आमदार राजकुमार पटेल हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. राजकुमार पटेल यांच्या बॅनर- पोस्टर वरून बच्चू कडू यांचा फोटो देखील हटविण्यात आला आहे. तेथे एकनाथ शिंदे यांचा फोटो लागल्यामुळे आमदार पटेल प्रहार सोडून शिंदे गटात जाणार अशी चर्चा आहे. या संदर्भात बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

बच्चू कडू पुढे म्हणाले, शिंदे गटाने एक खेळी खेळली आम्ही दहा खेळी खेडू. याचे परिणामही शिंदे गटाला भोगावे लागतील. राजकुमार पटेल यांच्यासोबत असलेली मैत्री कायम ठेवून आम्ही आमचा उमेदवार त्यांच्या विरोधात देऊ, असेही कडू यांनी स्पष्ट केले.

आणखी काही कार्यकर्ते प्रहार सोडणार ? 

पक्षामध्ये काहीजण राजकीय हेतूने तर काही आर्थिक हेतूने आलेले असतात. कार्यकर्त्यांमध्ये हौसे, नवसे सर्वच असतात. विचारांना जोडलेले कार्यकर्ते जन्मभर राहता आणि राजकीयदृष्ट्या आलेल्या लोकांचं इकडून तिकडून जाणं येणं सुरूच असतं. अशांचा प्रवास सुखाचा जावो. शेवटी प्रत्येकाचं राजकारण असतं. पण त्यांच्या जाण्यामुळे आमचा लढा कमी होणार नाही आमची लढाई कायम मजबूत राहील, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला. आणखी काही कार्यकर्ते प्रहारला सोडून जाण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री शिंदेंचे आमच्यावर ऋण, परंतु...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं, त्याचं ऋण आमच्यावर आहे. मात्र त्यांनी खेळलेली ही खेळी त्यांना अतिशय घातक ठरू शकते. आणि त्याच पद्धतीने आम्ही आता समोर जाणार आहोत, असेही बच्चू कडू म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT