अमरावती

Yavatmal News : आठ किलो गांज्या घेवून जाणाऱ्या तस्कराला अटक

करण शिंदे

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : तेलंगणातील अदिलाबाद येथून गांजा घेऊन आलेल्या तस्काराला रुंझा येथे पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. रविवारी (दि.9) पहाटे रुंझा येथील पेट्रोल पंप परिसरात तस्कर उभा असताना, त्याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान त्याच्या जवळून 8 किलो 870 ग्राम गांजा जप्त केला. पाढंरकवडा पोलिस आणि एलसीबी पथकाने गस्तीवर असताना, ही कारवाई केली.

पोलीस पथकाला खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, एक निळ्या रंगाचे शर्ट घातलेला व्यक्ती प्लास्टिकच्या पोत्यामध्ये गांजा घेऊन रुंझा गावाच्या बाहेर यवतमाळ रोडवरील पेट्रोलपंपाजवळ उभा आहे. त्यावरून पथकाने तत्काळ वरिष्ठांना याची माहिती देऊन ते ठिकाण गाठले. तेथे संशयित व्यक्ती आढळून आली. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली. दरम्यान त्याच्याकडे प्लास्टिक पोत्यामध्ये गांजा आढळून आला. अलीम सलीम खान (वय. 29, रा. अबुबकर मशीदजवळ, शांतीनगर, अदिलाबाद, तेलंगणा) असे आरोपीचे नाव आहे.

त्याच्याकडे खाकी टेपने गुंडाळलेल्या वेगवेगळया चार पाकिटांमध्ये 1 लाख 5 हजार २०४ रुपयांचा गांजा, एक मोबाइल आढळून आला. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक करून पांढरकवडा ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, एलसीबीप्रमुख आधारसिंग सोनोने, पाढंरकवडा ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक विवेक देशमुख, उपनिरीक्षक देवेंद्र मेशकर, विनोद राठोड, प्रशांत हेडाउ, उल्हास कुरकुटे, धनंजय श्रीरामे, मारोती पाटील, सचिन काकडे, राजू बेलेवार यांनी केली.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT