Harassment Pudhari
अमरावती

Sindhutai Sapkal Son Case | सिंधूताई सपकाळ यांच्या मुलाविरोधात गुन्हा; अल्पवयीन मुलीचा छळाचा आरोप

चिखलदरा पोलिसांत गुन्हा दाखल; वसतिगृहातील विद्यार्थिनीच्या जबाबावरून कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Chikhaldara Minor Harassment Allegations

अमरावती : दिवंगत ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे पुत्र अरुण सपकाळ यांच्याविरोधात अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाच्या आरोपावरून अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पॉक्सो कायदा, विनयभंग आणि इतर संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. वसतिगृहातील एका विद्यार्थिनीने दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

विद्यार्थिनीच्या जबाबावरून पोलिसांची कारवाई

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिखलदरा परिसरातील वसतिगृहात राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी अरुण सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला. अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये लागू होणाऱ्या पॉक्सो कायद्यासह विनयभंग आणि इतर संबंधित कलमांचा समावेश करण्यात आला आहे.

या प्रकरणात पुढील तपास पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT