अमरावती : अचलपूर-परतवाडातील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदला घेऊन जाताना पोलिस  
अमरावती

Amravati Video Case : परतवाडा शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदची काढली वरात, रिलमध्ये वापरलेली थार कार-पिस्तुलही जप्त

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : अचलपूर-परतवाडातील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्या पोलीस कोठडीत २७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला असून आज (दि.२२) अयानला सोबत घेऊन अचलपुरात त्याची वरात काढण्यात आली. यावेळी आरोपी अयानला धड चालताही येत नसल्याने तो मान खाली घालून लंगडत चालताना दिसून आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अयानने त्याचा एक आयफोन नुमान नावाच्या मित्राला विकला होता. त्या माहितीवरून पोलिसांनी आज सरमसपुरा परिसरात नुमानच्या घरी अयानला पायी नेले आणि तो मोबाईल जप्त केला. या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ असण्याची शक्यता असल्याने तो तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.

यासोबतच पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली थार कार आणि दोन एअर पिस्तुल सुद्धा जप्त केल्याची माहिती आहे. याच कारमध्ये बसून अयानने पिस्तुलसह रील बनवून सोशल मीडियावर रिल व्हायरल केली होती. तपासात ही कार आणि पिस्तुल अचलपूरच्या सावली दातुरा येथील रहिवासी राजेश प्रजापती यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले आहे.

न्यायालयाने अयान अहमदसह चार आरोपींच्या पोलीस कोठडीत २७ एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण ८ जणांना अटक करण्यात आली असून आरोपींकडून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये ८ पीडित मुलींचे १८ व्हिडिओ आणि ३९ छायाचित्रे आढळून आली आहेत. जप्त केलेले सर्व डिजिटल साहित्य फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले असून या प्रकरणात अजूनही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT