अमरावती

वर्षा लढ्ढा अमरावती महापालिका आयुक्त, तर सत्यम गांधी जिल्हा परिषदेचे नवे सीईओ

मनपा आयुक्त सत्यम गांधी हे आता अमरावती जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक राहणार आहेत

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : राज्य शासनाने गुरुवारी (दि.२) भारतीय प्रशासन सेवेतील अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. यात अमरावती जिल्ह्याला दोन नवीन वरिष्ठ अधिकारी मिळाले आहेत. वर्षा लढ्ढा यांची अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तपदी, तर सत्यम गांधी यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा-चांडक या प्रसूती रजेवर जात असल्याने त्यांच्या रिक्त जागी वर्षा लढ्ढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लढ्ढा या सध्या पुणे येथील महाराष्ट्र कृषी संशोधन व शैक्षणिक परिषदेत सदस्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. त्या महाराष्ट्र प्रशासन सेवेतील अनुभवी अधिकारी असून, त्यांना आयएएस केडरचे नामांकन मिळाले आहे.

अमरावती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्रा यांची सांगली मनपा आयुक्त म्हणून बदली झाली आहे. तेथील मनपा आयुक्त सत्यम गांधी हे आता अमरावती जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT