Accident Pudhari
अमरावती

Amravati Accident | मोर्शीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिला व पुरुषाचा जागीच मृत्यू

मोर्शी शहरालगत मायवाडी फाट्याजवळ आयशर ट्रकची मोटरसायकलला जोरदार धडक

पुढारी वृत्तसेवा

Morshi Road Accident

अमरावती : मोर्शी शहरालगत असलेल्या मायवाडी फाट्याजवळ शुक्रवारी (दि. ९) रात्री ८:३० वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. अज्ञात आयशर ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील महिला आणि पुरुष दोघांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतक महिला आणि पुरुष हे आपल्या स्प्लेंडर मोटरसायकलने (क्रमांक: एमपी ४८ एन १५७१) स्वतःच्या गावाकडे जात होते. मायवाडी फाट्यानजीक पाठीमागून येणार्‍या एका अज्ञात आयशर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, दोघेही रस्त्यावर कोसळले आणि गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच मोर्शी पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पुढील शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, मोर्शी येथे हलवले.

दरम्यान, अपघातग्रस्तांजवळ मिळालेल्या मोबाईलमधील संपर्क क्रमांकावर ठाणेदार आठवले यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो क्रमांक दुसर्‍या राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मृत महिला व पुरुषाची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. मोर्शी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत असून अज्ञात वाहनधारकाचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT