Gold and silver shop raid Amravati
अमरावती : अमरावती जिल्ह्यात सोन्या चांदीच्या दुकानांवर बुधवारी (दि.१४) आयकर विभागाने धाडसत्र राबविले. अमरावती शहरासह जिल्ह्यातील इतर ठिकाणी देखील या धाडी टाकण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने एकता आभूषण, पुनम ज्वेलर्स, प्रकाश ज्वेलर्स, इशा ज्वेलर्स यांचा समावेश आहे.
बुधवारी सकाळपासून हे झाड सत्र सुरू झाले. शहरातील राजकमल चौकात असलेल्या सुवर्ण अलंकारांच्या दुकानात आयकर विभागाचा ताफा पोलिसांसह दाखल झाला होता. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकलेल्या दुकानातील कागदपत्रे, कम्प्युटर, बिलांची तपासणी करण्यात आली.
संबंधित दुकानांमध्ये बनावट कागदपत्र आणि बिलं असल्याचा आयकर विभागाला संशय आहे. त्यामुळे हे धाडसत्र राबविण्यात आले. दरम्यान या संदर्भात अधिकृत माहिती अद्याप पर्यंत समोर आलेली नाही. अमरावती सह यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात देखील अशाच धाडी टाकण्यात आल्याची माहिती आहे.