प्रज्वल खरे  Pudhari
अमरावती

Amravati Crime | जुन्या वादातून मध्यरात्री युवकाचा निर्घृण खून, दोन आरोपींना अटक

जय सियाराम नगर भागात मध्यरात्रीच्या सुमारास घटना

पुढारी वृत्तसेवा

Amravati Youth Death

अमरावती : गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री (दि.४) एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जुन्या वैमनस्यातून प्रज्वल खरे नावाच्या एका युवकाचा निर्घृण खून करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जय सियाराम नगर भागात मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. जुन्या वादाचे पर्यावसान हत्येमध्ये झाले. आरोपींनी प्रज्वल खरे याच्यावर जीवघेणा हल्ला करून त्याची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या प्रकरणातील दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डीसीपी श्याम घुगे, क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण आणि गाडगे नगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार जाधव यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून हत्येमागचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT