अस्‍वलाने हल्‍ला केल्‍याने जखमी झालेल्‍या वृद्धावर उपचार सुरु असताना.  Pudhari Photo
अमरावती

अमरावती : अस्वलाच्या हल्ल्यात वृद्ध जखमी

Amravati News | भुलोरी वनखंड येथील घटना, उपचार सुरु

पुढारी वृत्तसेवा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: अमरावती जिल्‍ह्यातील रणीपासून 12 कि.मी. अंतरावर असलेल्या भूलोरी येथील रामभाऊ भाऊ कासदेकर (वय 58) यांच्यावर अस्वलाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. आज २० रोजी दुपारी ही घटना घडली.

रामभाऊ कासदेकर हे जुनापाणी येथे यात्रेसाठी गेले होते. पूजेनंतर जेवण करून परत भूलोरीकडे जात असताना वनखंड क्रमांक 736 मध्ये अचानक अस्वलीने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांनी आरडाओरड करत मदतीसाठी आवाज दिला.

रामभाऊ यांच्या आवाजाने आजूबाजूचे गावकरी घटनास्थळी धावून आले. त्यांनी अस्वलाला पळवून लावले आणि वनविभागाला तातडीने माहिती दिली. वनविभागाच्या मदतीने रामभाऊ कासदेकर यांना चारचाकी वाहनाने प्राथमिक आरोग्य केंद्र, बिजूधवडी येथे नेण्यात आले. तेथे डॉ. इंगोले यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे हलवले. तेथून नंतर अमरावती येथे रेफर करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT