ऊस-तोड मजुरांच्या ट्रॅक्‍टरला धडकेत ४ जण ठार 
अमरावती

अमरावती : अपघातात मोठा भाऊ ठार, बातमी ऐकून लहान भावानेही सोडला प्राण; दर्यापुरात दोन्ही भावांच्या एकत्र अंत्ययात्रा

backup backup

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : मोठ्या भावाच्या अपघाती मृत्यूनंतर लहान भावाने देखील प्राण सोडल्याची दुर्दैवी घटना दर्यापूरात घडली असून आज शनिवारी एकाच घरातून दोघांचीही अंत्ययात्रा कढण्यात आली. यावेळी एकाच कुटुंबावर झालेला हा दुहेरी आघात पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

दर्यापूर तालुक्यातील लखापुर फाट्याजवळ शुक्रवारी सायंकाळी (दि.२२ डिसेंबर रोजी) झालेल्या भीषण अपघातात मो. खालिक यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती त्यांच्या परिवारात समजताच त्यांचा लहान भाऊ मो. शाहिद मो. अहमद यांचाही हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. ही माहिती शहरात समजतात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. आज (दि. २३) दुपारी या दोन्ही भावांच्या अंत्ययात्रा एकाच घरातून एकाच वेळेस निघाल्यावर उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

लखापुर फाट्याजवळ आपल्या शेतात कापूस वेचण्याकरिता मजूर घेऊन गेलेले मो. खालिक काल सायंकाळी ट्रॅक्टरमध्ये कापसाचे गाठोडे लावत होते. यावेळी भरधाव आलेल्या एका चारचाकीने त्यांच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या अपघातात मो. खालिद यांचा जागेवरच मृत्यू झाला. यामध्ये त्यांच्यासह इतर पाच जण गंभीर जखमी झाले.

अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनातील कारचालक व अन्य एकजण किरकोळ जखमी झाला. दर्यापूर पोलिसांनी अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली असून वाहन चालक अंकुश डोंगरदिवे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास दर्यापूर पोलीस करत आहेत.

आ.यशोमती ठाकूर यांनी केले सांत्वन

दरम्यान आज अपघातातील मृतक मो.खालिक यांचा लहान भाऊ देखील हृदयविकाराच्या झटक्याने दगावल्याची वार्ता समजताच माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आमदार बळवंत वानखडे, सुधाकर पाटील भारसाकळे, यांच्या समवेत दर्यापुरात येऊन मृतांच्या निवासस्थानी भेट दिली.  कुटुंबाचे त्यांचे सांत्वन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT