अमरावती

Amravati Crime : अमरावती हादरली! बंद घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह; लिव्ह-इन पार्टनर फरार

काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा गावात एका बंद घरात ४८ वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह शनिवारी १९ सप्टेंबर रोजी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वैशाली ठाकरे ऊर्फ वैशाली मेहरे (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली या मागील काही वर्षांपासून ललित सुनील मेहरे (वय ३५ ते ४०) याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होत्या. मागील तीन दिवसांपासून घर बाहेरून कुलूपबंद होते. शनिवारी सकाळी घरातून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने गावकऱ्यांनी पोलीस पाटलांना माहिती दिली. त्यानंतर बडनेरा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजाचे कुलूप तोडले असता, आत वैशाली यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. मृतदेहाच्या स्थितीवरून काही दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

घटनेनंतरपासून सोबत राहणारा ललित मेहरे फरार असून त्याच्यावर संशयाची सुई आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दोघेही व्यसनी असल्याने दारूच्या नशेत झालेल्या वादातून ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच एसीपी आलूरकर, बडनेरा पोलीस पथक आणि अमरावती फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत पुरावे गोळा केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून बडनेरा पोलिसांनी हत्येसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी ललितच्या अटकेनंतर व शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT