अमरावती

Amravati crime: अमरावतीत हादरले! कॉलेज कॅम्पसमध्ये रक्तरंजित थरार, मित्रानेच केला मैत्रीणीवर चाकूने वार

कॉलेजमध्ये पळापळ आणि घबराट.. पण तरीही हल्लेखोर विद्यार्थ्याला पकडून दिला चोप

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : येथील बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका महाविद्यालयाच्या परिसरात मंगळवारी (दि. २९) दुपारी एका थरारक घटनेने प्रचंड खळबळ उडाली. कॉलेजच्या आवारातच एका विद्यार्थ्याने आपल्या वर्गमैत्रिणीवर चाकूने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी आणि हल्लेखोर तरुण हे दोघेही एकाच वर्गात शिकत आहेत. मंगळवारी दुपारच्या सुमारास आरोपीने अचानक विद्यार्थिनीच्या गळ्यावर चाकूने थेट वार केले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे कॅम्पसमध्ये एकच पळापळ आणि घबराट उडाली. गळ्यावर खोलवर वार झाल्याने विद्यार्थिनी गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.

घटनेचे गांभीर्य पाहून प्रत्यक्षदर्शी विद्यार्थी व नागरिकांनी तातडीने धाव घेत हल्लेखोराला जागेवरच पकडून चोप दिला आणि तत्काळ घटनेची माहिती बडनेरा पोलिसांना दिली. दरम्यान, जखमी विद्यार्थिनीला उपचारासाठी अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस पुढील सखोल तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT