अमरावती

Amravati Crime News : जुन्या वादातून बडनेरा रेल्वेस्थानकाजवळ तरुणाची हत्या

मोहन कारंडे

अमरावती; पुढारी ऑनलाईन डेस्क : जुन्या वादातून एका तरुणाची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बडनेरा रेल्वेस्थानक परिसरात शुक्रवारी (दि.२२) घडली. विक्रम पप्पू संगते (वय २८, रा. टिळक नगर, जुनी वस्ती, बडनेरा) असे मृताचे नाव आहे. या हत्याप्रकरणात तिघांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली असून, बडनेरा पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. या घटनेतील मृतक व आरोपी हे पोलीस रिकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, बडनेरा रेल्वे स्थानकाजवळील तिरुपती हॉटेलजवळ एका तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून बडनेरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी मृताची ओळख विक्रम पप्पू संगते या नावाने झाली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात नेला. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. मृताच्या डोक्यावर धारदार शस्त्राने जोरदार हल्ला करण्यात आल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर हत्याकांड करून पसार झालेल्या लवक्या उर्फ लवकेश, साहिल मेश्राम व अन्य एक अशा तीन आरोपींचा शोध सुरू आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT