Amaravti fraud case | साबण तयार करण्यासाठी कच्च्या तेलाचा टँकर देण्याच्या नावावर ८ लाखांची फसवणूक!  (Pudhari File Photo)
अमरावती

Amaravti fraud case | साबण तयार करण्यासाठी कच्च्या तेलाचा टँकर देण्याच्या नावावर ८ लाखांची फसवणूक!

राजापेठ पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

अमरावतीः कच्च्या तेलाचा टँकर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत एका व्यापार्‍याची तब्बल ८ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार अमरावती शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश तिलकराज सिंह (वय ५६, रा. रुक्मिणी नगर, अमरावती) यांचा एमआयडीसी परिसरात साबण तयार करण्याचा कारखाना आहे. साबण निर्मितीसाठी लागणारे कच्चे तेल खरेदी करण्याच्या निमित्ताने त्यांची आरोपींशी ओळख झाली होती. दरम्यान, आरोपींनी फिर्यादींना फोन करून हिंगणघाट येथील सुदर्शन कॉटन इंडस्ट्रीजमध्ये कच्च्या तेलाचा टँकर उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच संपूर्ण रक्कम दिल्यानंतर टँकरची डिलिव्हरी मिळेल, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. आवश्यकतेमुळे फिर्यादींनी आरोपींना १० लाख रुपये दिले. मात्र, त्यानंतर डिलिव्हरी घेण्यासाठी हिंगणघाट येथे गेल्यानंतर समजले की, संबंधित कंपनीकडे अशी कोणतीही रक्कम जमा करण्यात आलेली नाही.

तपासात आरोपींनी घेतलेली रक्कम आपसात वाटून घेतल्याचे समोर आले. त्यानंतर फिर्यादींनी संपर्क साधल्यानंतर ३० जुलै २०२५ रोजी आरोपींनी २ लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित ८ लाख रुपये परत न करता फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी हमीद खान गफार खान, मुसादीक खान हमीद खान (रा. वरुड वेस जिंतुर, जि. परभणी), दीपक भोसले (रा. जालना) आणि सलीम अहमद ऊर्फ हाजी तसेच एसएस ट्रेडर्स (रा. अमरावती) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (२), ३१८ (४), ३ (५) बी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या लेखी तक्रारीच्या आधारे आणि पोलिस उपायुक्त (परिमंडळ-२) यांच्या मार्गदर्शनानुसार राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT