Congress leader's son missing
अमरावती : अमरावती कॉंग्रेसचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा बेपत्ता असल्याची बातमी समोर येत आहे. वैभव मोहोड (वय ३०) असे त्यांच्या बेपत्ता मुलाचे नाव आहे.
बुधवार (दि. १४) मे रोजी वैभवचे लग्न असून त्याच्या बेपत्ता होण्याने खळबळ उडाली आहे. याविषयी हरिभाऊ मोहोड यांनी अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव हा शिवाजी महाविद्यालयात लिपिक पदावर कार्यरत आहे. मंगळवारी सकाळी (दि. १३) रोजी तो सामान आणायला बाहेर जातो असे सांगून बाहेर गेला तो परत घरी आलाच नाही. वैभवने सकाळीच एटीएम मधून 40 हजार रुपये काढल्याची माहितीही मिळत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास फ्रेजरपुरा पोलीस करत आहेत.