Child marriage  File Photo
अमरावती

Child marriage Amravati | अत्याचारातून गर्भवती: अल्पवयीन मुलीचे लावून दिले लग्न; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

अमरावती जिल्ह्यातील धारणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटनेने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Minor girl forced marriage

अमरावती : एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या बहिणीच्या जावयाने अत्याचार केला. त्यामुळे ती गर्भवती राहीली. हा प्रकार लपवण्यासाठी पीडितेच्या आईने मुलीचे लग्न एका तरुणाशी लावून दिले. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीसोबत तिच्या पतीनेही शारीरीक संबंध प्रस्थापित केले. हा धक्कादायक प्रकार मुलीला प्रसूतीकरिता रुग्णालयात दाखल केल्यानंतर उघड झाला. याप्रकरणात पोलिसांनी तिच्या पतीसह तिघांविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील धारणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी जून २०२५ मध्ये पावसाळ्याच्या दिवसांत कामासाठी आपल्या बहिणीच्या घरी गेली होती. तिथे वास्तव्यास असताना तिच्या जावयाने तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर अनेक वेळा बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. या सततच्या अत्याचारामुळे पीडित मुलगी ७ महिन्यांची गरोदर राहिली. ही बाब जेव्हा मुलीने आपल्या आईला सांगितली, तेव्हा समाजात बदनामी होईल, या भीतीने आईने पीडितेचे घाईघाईत लग्न लावून दिले.

लग्नानंतर तिच्या पतीनेही तिच्याशी संबंध ठेवला. पीडितेच्या प्रसूतीची वेळ जवळ आल्याने तिला अकोला येथील एका शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसूती प्रक्रियेदरम्यान कागदपत्रांची पूर्तता करताना पीडितेचे आधार कार्ड तपासले असता, प्रशासनाच्या लक्षात आले की तिचे वय केवळ १६ वर्षे आहे. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने रुग्णालय प्रशासनाने तातडीने अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्याला याची माहिती दिली.

अकोला पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात पोहोचून पीडितेचा जबाब नोंदवला. पीडितेने दिलेल्या जबाबाच्या आधारे, रामदासपेठ पोलिसांनी दीर, पती आणि लग्नाशी संबंधित अन्य एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील धारणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने, अकोला पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी धारणी पोलिसांकडे वर्ग केला आहे. सध्या धारणी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT