अपघातग्रस्‍त एसटी बस व मृत रुद्र घिंडाणी 
अमरावती

अमरावती : एसटीच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू, आई गंभीर

Amaravati News | बडनेरा जुनी वस्तीत पेट्रोलपंपासमोर अपघात

पुढारी वृत्तसेवा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: भरधाव एसटीने दुचाकीला धडक दिल्याने एका सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर त्याची आई गंभीर जखमी आहे. रुद्र मंगेश घिंडाणी (वय ७ वर्ष) असे मृतक मुलाचे नाव आहे,तर भक्ती मंगेश घिंडाणी (वय ३४, रा. पवननगर, जुनीवस्ती, बडनेरा) असे जखमी आईचे नाव आहे. ही घटना बडनेरा-अमरावती मुख्य मार्गावर चमन नगराजवळील पेट्रोल पंपाजवळ ११ एप्रिल रोजी सकाळी ८.४५ वाजताच्या दरम्यान घडली.

सविस्तर वृत्त असे की, बडनेरा जुनीवस्तीतील पवननगरात राहणारा रुद्र हा त्याची आई भक्ती घिंडाणी यांच्या सोबत सकाळी ८.३० वाजता चेतक मोपेड क्रमांक एमएच २७ डीके ८४४३ या वाहनाने शाळेत जात होता. दरम्यान जुनीवस्तीतील पेट्रोलपंप समोर एस. टी. बस क्रमांक एमएच १४ एलएक्स ८८६३ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणाने चालवून भक्ती घिंडाणी यांच्या दुचाकी वाहनाला धडक दिली. त्यामुळे त्यांचे वाहन अनियंत्रीत होऊन रस्त्यावर कोसळले. रुद्र हा उजव्या साईडला रोडवर पडला होता, तर त्याची आई भक्ती डाव्या साईडला गाडीसह खाली पडली होती. दरम्यान रुद्रला बसच्या चाकामुळे डोक्याला मागील बाजूस गंभीर मार लागला. तसेच रुद्रची आई भक्ती यांच्या चेह-यावर, हाताला, पायाला मार लागुन त्या देखील जखमी झाल्या. या अपघातानंतर रुद्र व त्याची आई भक्ती यांना काही लोकांनी प्रथम राठी हॉस्पीटलमध्ये नेले. तेथे रुद्रला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. बडनेरा पोलिसांनी एस.टी. चालकाविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.

अपघातास कारणीभूत ठरलेली बस ही अकोला-चंद्रपूर फेरी करीत होती. चालक दिगंबर मंगल कनाके (वय ४१, रा. शेखबराज, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) याला बडनेरा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रुद्रच्या अपघाती मृत्यूनंतर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT