अमरावती : अमरावतीत गौण खनिज उत्खननाच्या वादातून एका व्यावसायिकाने दुसऱ्या व्यावसायिकाच्या अंगावर कार नेऊन चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये शहरातील बिल्डिंग मटेरियल सप्लायर निलेश बदुकले (वय 42) यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी अजय भूजंगराव लंगोटे (रा. थुगाव पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
मृत निलेश बदुकले यांचे वडील सुरेश भीमराव बदुकले (वय 71, रा. ब्राह्मणवाडा, ता. चांदूरबाजार) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार निलेश बदुकले व त्यांची पत्नी सकाळी रस्त्याने मॉर्निंग वॉकला गेले होते. यावेळी आरोपी अजय भुजंगराव लंगोटे याने आपल्या महेंद्रा कारने निलेश आणि त्याच्या पत्नीला धडक मारली. यामध्ये निलेश डोक्याला व शरीराला गंभीर इजा झाली. त्यांना अमरावती येथे रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.